• Thu. Feb 5th, 2026

आ.अमित देशमुख यांच्याकडून लातूरसह चाकूर, उदगीर व देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावची केली पाहणी

Byjantaadmin

Sep 21, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूर तालुक्यासह चाकूर, उदगीर व देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावची केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी साधला संवाद,
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना

लातूर प्रतिनिधी:
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
रवीवार दि. २१ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यासह चाकूर, उदगीर तसेच देवणी तालुक्यातील
अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली.
या पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातुर
तालुक्यातील  कासारखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी नजीर शेख यांच्या शेतात
जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि
संबंधित अधिकार्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी लातूरचे तहसीलदार-सौदागर तांदळे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी-
श्याम गोडभरले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- अभय साळुंके, विकासरत्न विलासराव
देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक काळे, महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, लातूर तालुका काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, लातूर उपकृषी अधिकारी-सूर्यकांत लोखंडे, सहाय्यक कृषी अधिकारी-
विशाल झांबरे, तलाठी- स्वप्नील बेंबडे, जिल्हा परिषदचे शाखा अभियंता- क्षितिज खरोळकर,
ग्रामपंचायत अधिकारी- एस जे ढोबळे, तात्यासाहेब देशमुख, राजकुमार पाटील, प्रवीण सूर्यवंशी, शरद
देशमुख, चंद्रकांत शिंदे, रघुनाथ शिंदे, सुभाष माने,अनिल शिंदे ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर चाकूर तालुक्यातील नळेगाव या गावास भेट देऊन नळेगाव येथील शेतकरी वाघंबर
वेळापुरे  यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतातील सोयाबीन आणि ऊस पिकाची
पाहणी केली.पाहणीनंतर शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.
दरम्यान यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याशी संवाद साधताना शेतकऱ्यानी
त्यांना शासनाकडून मिळणारी सद्याची अतिवृष्टी आर्थिक मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे सांगत

सदरची शासन मदत वाढवण्याची मागणी शासन दरबारी आपण लावून धरावी, अशी इच्छा व्यक्त
केली. यावेळी नायब तहसीलदार-दिगंबर स्वामी, चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-विलास
पाटील, चंद्रकांत मद्दे,अनिल चव्हाण,तालुका कृषी अधिकारी- एस खंदाडे, मंडळ कृषी अधिकारी-
पाटील,कृषी पर्यवेक्षक-विजय व्यंजने, मंडळ अधिकारी-माया येमले, कृषी सहाय्यक-
आर.डी.स्वामी,सलीम तांबोळी,नळेगाव ग्रा.पं.सरपंच- सूर्यकांत चव्हाण,  निलेश देशमुख, महेश
नागलगावे,सुदर्शन बिरादार नळेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर पुढे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील
अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेले शेतकरी श्री.विश्वंभर बारोळे व श्री.शिवलिंगआप्पा बारोळे
यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.आणि संबंधित प्रधासनातील अधिकारी व
कर्मचाऱ्यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आशा सूचना केल्या तसेच तोंडार व परिसरातील
शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली. यावेळी नायब तहसीलदार- ज्ञानोबा मोरे,लातूर उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-
कल्याण पाटील,तलाठी- एम.एस.केंद्रे,मंडळ अधिकारी- कैलास उडते,लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या
अध्यक्षा- शीलाताई पाटील,आशिष पाटील,पद्माकर उगिले, शिवाजी बिरादार आदिसह तोंडार व
परिसरातील शेतकरी बांधव,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी देवणी तालुक्यातील पंढरपूर या
ठिकाणी अतिवृष्टी मुळे अतोनात नुकसान झालेले शेतकरी शरद माधवराव पाटील यांच्या शेतात
जाऊन शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी देवणी तहसीलदार-सोमनाथ वाडकर,लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष-
डॉ.अरविंद भातांबरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक- दिलीप पाटील
नागराळकर,लातूर जिल्हा परिषद शाखा अभियंता- प्रशांत शेटे, देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस
उपनिरीक्षक गोपाळ वराडे,पंढरपूरचे ग्रा.पं.उपसरपंच राजकुमार हसनाबादे,तलाठी- धनराज भंडारे,
ग्रामपंचायत अधिकारी-पवन बिरादार,प्रवीण सूर्यवंशी,शरद देशमुख,लालबेग युसुफ मंगरुळे, नागेश
पाटील, महेश पाटील, राजकुमार हसनापुरे आदिसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,पंढरपूर
देवणीसह परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *