• Thu. Feb 5th, 2026

वडिलांना रुग्णालयात भेटायला जात असताना वाटेत अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत

Byjantaadmin

Sep 19, 2025

वडिलांना रुग्णालयात भेटायला जात असताना वाटेत अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत

वाटेत नियतीचा वेगळाच खेळ…

निलंगा 

लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहेत. औसा निलंगा या महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची काम थांबल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यातच भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना निलंगा औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (18 सप्टेंबर) सकाळी 11: 55 वाजता घडल्याची माहिती आहे. हबीब हसन शेख (वय 32 रा. शेडोळ ता. निलंगा) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत तरुण हा निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील रहिवासी असून ते मिस्त्री काम करून आपली उपजीविका भागवात होता. गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी मयत तरुणाच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना निलंगा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची माहिती तरुणाला त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यानंतर तरुण हा आपल्या शेडोळ गावातून एम एच 24 ए व्ही 0309 या क्रमांकाच्या दुचाकीवरून निलंगा येथे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या दिशेने येत होता.

निलंगा औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीत पेट्रोल भरलं. त्यानंतर तो रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर येत असताना औसा मार्गांवरुन निलंगाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या निलंगा – लातूर एसटी बस क्रमांक एम एच 13 सी यु 8653 या क्रमांकाच्या एसटी बस चालकाने दुचाकी स्वारास जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुणास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदरील घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तरुणाला मयत घोषित केले. सदरील एसटी बसचाकल घटनास्थाळावरून पळून गेला असून याबाबत निलंगा पोलीस घटनास्थळीचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत तरुणाला तीन मुली असून पत्नी बाळंतीन आहे. मयत तरुण हा एकुलता एक असून त्याला एक बहीण, आई-वडील असा परिवार असून वडील हे शेती करून आपली उपजीविका भागवत असल्याची माहिती शेडोळ गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *