मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी स्वतंत्रता सेनानी गणपतराव निंबाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्साहात संपन्न
निलंगा: दिनांक 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी स्वतंत्रता सेनानी गणपतराव नारायणराव निंबाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कासारशिरसी रोड निलंगा येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी अतिशय उत्साहात व असंख्य जनसमुहाच्या उपस्थितीत जेस्ट विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ.नागोराव कुंभार व त्यांची मुलगी डॉ.कमल विलेकर व इतर मान्यवर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवराने स्वतंत्रता सेनानी गणपतराव निंबाळकर यांच्या शौर्यपूर्ण व गनिमीकाव्या ने केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या विचारधारेबद्धल परखड असे मत व्यक्त केले.गणपतराव निंबाळकर यांच्या विचारधारेतून तयार झालेला छत्रपती शिवराय, फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी, विज्ञानवादी विचारधारेचा हा निंबाळकर परिवार महाराष्ट्र भूषण परिवार म्हणून घोषित झाला पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंतानी व्यक्त केले.कारण निंबाळकर परिवाराने शिक्षणाची कास धरून उच्च शिक्षित मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स , इंजिनियर,न्यायाधीश, वकील केले आहेत, त्यांच्या परिवारात जातीव्यवस्था मोडीत काढण्यासाठी ठरवून अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत.त्यांचा परिवार हा संपूर्ण निर्वेसणी व शाकाहारी आहे.या परिवार मध्ये देशभक्ती देशप्रेम चा इतिहास आहे.अशा परिवाराचे आपण गुण गौरव केला पाहिजे जेणे करून इतरांसाठी आदर्श व मार्गदर्शक ठरू शकतात अशी भावना व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.अण्णाराव पाटील हे होते.प्रमुख उपस्थिती माधव बावगे, अँड.जे.बी.सूर्यवंशी, रामराजे रावण आत्राम, रंगनाथ घोडके,सौ.संगीताताई निलंगेकर, श्रीमती सुनीताताई चोपणे, ऍड.कृष्णाथराव आकनगीरे, डॉ.मधुकर विलेकर, डॉ.महेश श्रीमंगले, प्रताप माने, सूर्यकांत हुलसुरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमस मोठ्या संख्येने जण समुदाय उपस्थित होता. हा कार्यक्रम डॉ. हिरालाल निंबाळकर यांच्या संकल्पने मुळे यशस्वी झाला,संयोजन समिती व निंबाळकर परिवाराने ने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक अजित निंबाळकर यांनी केले सूत्रसंचालन शमशोदिन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मंजुषाताई निंबाळकर यांनी मांडले.

