शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
निलंगा:- शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर शिवाजी माने यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील महिला आघाडी उबाठा गटाच्या तालुकाप्रमुख शहर प्रमुख यांच्यासह असंख्य महिलांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला…
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी निलंगा तालुक्यातील उबाठा गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखा पुजारी महिला आघाडी निलंगा शहर प्रमुख दैवता सगर रेहाना उस्मान आली सय्यद यांच्यासह सुमन सतीश कांबळे, जया सूर्यवंशी, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कांबळे, रेणुका सुरवसे, रमाताई सूर्यवंशी ,झुंबर नारायण ,अशा अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखा पुजारी यांनी आपले मत मांडत असताना शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीअडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना लाडक्या बहिणीसाठी घेतलेले निर्णय हे अत्यंत चांगले निर्णय असून आम्ही आमच्या लाडक्या भावापासून बाजूला राहू शकत नाही .म्हणून आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत या पुढचं संपूर्ण आयुष्य सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सोबतच शिवसेनेमध्ये लाडक्या बहिणी म्हणून घालवू अशा म्हणाल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की ज्या विश्वासाने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहात त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही निश्चित स्वरूपाने एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागामध्ये शिवसेना महिला आघाडी मजबूत करून सर्व महिलांना न्याय देण्यासाठी तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली. यावेळी महिला आघाडी लातूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ रंजनाताई कुलकर्णी यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपण सर्वजण मिळून महिला आघाडी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहू त्यासाठी मी सुद्धा आपल्या सोबत नेहमी तुमच्या खांद्याला खांदा लावून राहील असा शब्द दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य यांनी केले तर आभार शिवसेनेचे शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख यांनी मानले सदरील कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिराजदार, देवदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख मुस्तफा शेख ,गणेश पेठकर इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

