• Thu. Feb 5th, 2026

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा हरीजवळगा येथे उपोषणाचा दुसरा दिवस

Byjantaadmin

Sep 19, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा हरीजवळगा येथे उपोषणाचा दुसरा दिवस

(तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा)

निलंगा:- संपूर्ण निलंगा तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेनुसार वीस टक्के बोनस देण्याचे आश्वासन पाळावे तसेच कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार हे हरीजवळगा येथे कालपासून उपोषणास बसले आहेत.निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाने झोडपले असून शेतांमध्ये पाण्याची तळे बनली आहेत तरीही शासन फक्त नदीकाठच्या शेतीचेच पंचनामे करण्यात व्यस्त आहे.तरी शासनाने हा पंचनाम्याचा फार्स थांबवावा व संपूर्ण तालुक्यात आणि संबंध जिल्ह्यात  ओला दुष्काळ जाहीर करावा.सरकारने पर्जन्यमापक यंत्र हे कुठेतरीच व दर्जाहीन बसवल्यामुळे शासनाकडे खऱ्या पर्जन्यवृष्टीची नोंद नाही म्हणून शासनाने पाण्यात डुबलेली जिल्ह्यातील सर्व शेती पाहून ओला दुष्काळ जाहीर करावा.तसेच ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करून हमीभाव व शेतकऱ्यांना मिळणारा भाव यातील तफावत दूर करण्यासाठी जाहीरनाम्यात दिलेल्या अश्वासनानुसार वीस टक्के बोनस अधीक जीएसटी प्रदान करावी.कर्जमुक्तीची घोषणाही ओला दुष्काळ पडल्यामुळे शासनाने  तात्काळ करावी अन्यथा शेतकऱ्यांचे आत्महत्तेने मुडदे पडतील असे डॉ भिकाने यांनी उपोषणस्थळी बोलताना सांगत मागण्या मान्य होई पर्यंत सचिन बिराजदार मागे हटणार नाहीत असे सांगितले.मनसेने शेतकऱ्यांचे विषय लावून धरत गेल्या काही दिवसांपासून निवेदने,रस्तारोको आदी आंदोलने केली आहेत व शेवटी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.चौकट[भाजपाने जाहीरनाम्यात भावांतर योजना देण्याचे आश्वासन कर्जमुक्ती सह दिले होते ते भाजपा आमदारांनी  उपोषणस्थळी भेट देत कधी देणार हे लेखी दिल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही व त्यांच्या दुर्लक्षामुळे जर उपोषणकर्ते सचिन बिराजदार यांची प्रकृती खालावली तर मनसे व शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी दिला आहे].यावेळी माजी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,प्रदीप शेळके,शहराध्यक्ष अबू बकर,तालुकाउपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, तालुकाउपाध्यक्ष बालाजी पवार,कृष्णा सुरवसे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *