• Thu. Feb 5th, 2026

महाराष्ट्र महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित महाराष्ट्र महाविद्यालय मध्ये वृक्षारोपण

Byjantaadmin

Sep 19, 2025

महाराष्ट्र महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित महाराष्ट्र महाविद्यालय मध्ये वृक्षारोपण

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये संघटनेच्या वतीने 28 बॉटल पाम वृक्षाची लागवड करण्यात आली. माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कर्मवीर कदम सर ,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ गजेंद्र तरंगे सर, सचीव श्री कुमोद लोभे, उपाध्यक्ष प्रा. दत्ता शाहीर सर, कोषाध्यक्ष प्रा. शत्रुघ्न थोरमोटे, संघटक श्री वैभव पाटील, सदस्य प्रा. अरुण चव्हाण, सौ. शैला देशमुख, माजी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 *वृक्षारोपण उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ भास्कर गायकवाड, डॉ डी एस चौधरी माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ सुभाष बेंजलवार, प्रा. संदिप सुर्यवंशी, प्रा. धनराज किवडे, ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी बोंडगे, क्रिडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ, विठ्ठल सांडूर, प्रा. शिवरुद्र बदनाळे, एनसीसीचे केअरटेकर ऑफिसर डॉ. सचीन बसूदे, व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *