• Thu. Feb 5th, 2026

लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा…माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी  जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी

Byjantaadmin

Sep 19, 2025

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी  जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी

लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा…

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी  जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी

निलंगा

लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले  यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पूरस्थिती व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी नागरिकांचे विशेषतः शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधा देखील ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठा प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदर अमित विलासराव देशमुख माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदर  रमेशअप्पा कराड, , आमदर अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे-ठाकूर तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *