जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
लातुर:-येथील जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे माजी प्राचार्य. बी.ए.मैंदर्गे, जी. रमेश,प्राचार्य.रामु , माजी ऊपप्राचार्य. शरद साधु, प्रा.संपदा साधु,प्रा.अप्सरा सय्यद,ऊमाकांत बिराजदार,प्रा.श्रीधर पौळ,इंजि. सत्याप्रकाश यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत माजी विद्यार्थी मेळावा साजरा करण्यात आला.भारताचे भुतपुर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. स्व.राजीवजी यांच्या संकल्पनेतुन भारतात नवोदय विद्यालयाची स्थापना झाली नवोदय परिवार, लातुर 1986 पासुन ते 2022 पर्यतच्या सर्वच आजी, माजी विद्यार्थी यांना आदराची व सन्मानपुर्वक वागणुक दिली.. नवोदय विद्यालय, लातूर च्या सर्वागिण विकासासाठी सर्वच गुरुजनांनी महत्त्व पुर्ण योगदान दिले आहे. तसेच विद्यार्थी उपयोगी अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिलेत. नवोदय विषयी तळमळ नवोदयच्या विद्यार्थ्यांची विषयी प्रेम व तसेच भारत देशाच्या विकासामध्ये नवोदयच्या विद्यार्थ्यांचा सहभाग अशी दूरदृष्टी असणारे नवोदयच्या विद्यार्थ्यांचे वेगळेपण नमूद करताना नवोदयचा विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपलं प्रतिबिंब कसा उमटावत असतो आणि त्याची समाजात कशी छाप असते असे प्राचार्य.बी.ए.मैंदर्गे सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.माजी विद्यार्थी तहसिलदार. रेणुकादास देवणीकर, न्यायाधिश. प्रविण देशमाने यांनी विद्यालयाप्रती मनोगत व्यक्त केले. भावी आयुष्यासाठी लातुर परिवारातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करुन शुभकामना देण्यात आल्या.यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.गंगासागर आचार्य, तहसिलदार. रेणुकादास देवणीकर,डाँं.सुवर्णा कोरे,शिरुर अनंतपाळ येथील नगरसेवक. सुधीर लखनगावे, जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकारी. विठ्ठल लोंढे,न्यायाधीश. प्रविण देशमाने,जगदीश नाईकवाडे, प्रा.सुषमा थोरात, डाँं.शिला भोंग-पाटील,रेखा नामपल्ले,डाँं.आनंद बरगाले,कुलदीप पिल्लेवाड,डाँं.रवि बनसोडे,विनायक पवार,प्रा.गणेश ठाकुर,प्रद्या आटकोरे,विशाल लोहारकर,मनोज सावंत,प्रा.प्रविण कवटकर,बळवंत सरवडे, हनमंत सावंत,शिल्पा वाघमारे,सुनील शेळगावकर,डाँं.तुकाराम बनसोडे,अजय घनगावकर,दिनकर बोयणे,कंठेश्वर बुडगे,अमरदिप बनसोडे,विजयानंद नारागुडे यांच्यासह 1986 च्या पहिल्या बँंचपासुन ते 2021 पर्यतचे विवीध श्रेत्रात कार्यरत असणारे विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संस्थेने माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाला नवोदय विद्यालय परिसरात ऊपस्थीत राहुन विद्यालयाच्या जुन्या आठवणींना ऊजाळा दिला.यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन.कुलदीप पिल्लेवाड यांनी केले.