• Wed. Apr 30th, 2025

लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या नेत्र तपासणी शिबिरात ४१५ रूग्णांची तपासणी

Byjantaadmin

Dec 26, 2022

लक्ष्मी अर्बन बॅंकेच्या नेत्र तपासणी शिबिरात ४१५ रूग्णांची तपासणी

लातूर,  : येथील लक्ष्मी अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅंकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच अग्रवाल समाज, लायन्स क्लब व उदयगिरी लायन्स आय रूग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी अग्रेसन भवन लातूर येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या सुरुवातीस लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी प्रस्ताविक करताना बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व बँकेने आर्थिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा मागोवा घेतला, तसेच उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर संचलित अंध विद्यालयास बँकेतर्फे ५१००० रु डोनेशन देण्याची घोषणा केली व चेक ही देण्यात आला. मनोगत व्यक्त करताना उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे संचालक ला. डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी मागील १७ वर्षात १६०००० पेक्षा जास्त रूग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले तसेच बँकेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व लोकांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहनही केले,तसेच अग्रवाल समाज लातूर, लायन्स क्लब लातूर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी लायन्स क्लब लातूरचे अध्यक्ष ला. पी. व्ही. विवेकानंद व सचिव ला. अशोक पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लक्ष्मी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सूर्यप्रकाश धूत यांनी आभार व्यक्त करताना बँकेच्या सामाजिक कार्याची भुमिका मांडली व सर्वांचे आभार मानले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रगीताने उदघाटनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ४१५ पेक्षा जास्त रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे व औषध वाटप करण्यात आले. जवळपास ८० पेक्षा रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथे पाठवण्यात आले.

या प्रसंगी सिनियर ला. रामपालजी सोमाणी, ला. डॉ. रामप्रसाद लखोटिया, लक्ष्मी अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष सूर्यप्रकाश धूत, बँकेचे संचालक तेजमल बोरा, अजितलाल आळंदकर, सुरेशचंद्र जैन, प्रल्हाद दुडिले,शशिकांत मोरलावार, सतिष भोसले, किशोर भराडिया, संचालिका माला भुतडा,अग्रवाल समाज ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल,कमलकिशोर अग्रवाल,विनोद अग्रवाल, लायन्सचे माजी अध्यक्ष जयराम भुतडा, लायन्स क्लब लातूरचे अध्यक्ष पी. व्ही. विवेकानंद, सचिव अशोक पांचाळ, ला. तेजस चव्हाण, लायन्स नेत्र रुग्णालयाच्या डॉ. अपूर्वा तोषणीवाल, डॉ. गणेश जोगदंड, काउंसलर विष्णु पवार, बँकेचे प्र. सीईओ अविनाश आळंदकर, शाखधिकारी हनुमानदास बांगड, प्रताप जाधव,अनिता कातपुरे, सुशील जोशी, संतोष बनभेरू, रविंद्र मदने, दिनेश कांबळे, सुहास राजमाने व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व उपस्थितांना कोविडच्या दक्षतेसाठी मास्कचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅंकेचे अधिकारी सुशील जोशी यांनी केले व बँकेचे उपाध्यक्ष सूर्यप्रकाश धूत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed