• Thu. Feb 5th, 2026

इंडियन डेंटल असोसिएशन लातूरची डेंटल झेनित कार्यशाळा संपन्न

Byjantaadmin

Sep 16, 2025

इंडियन डेंटल असोसिएशन लातूरची डेंटल झेनित कार्यशाळा संपन्न
लातूर,दि.16 ः इंडियन डेंटल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने रविवारी कार्नीवल रिसॅार्ट लातूर येथे 9 वे महाराष्ट्र राज्य झोनल कॉन्फरन्स लातूर डेंटल झेनित कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या कार्यशाळेसाठी सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, नांदेड, अमरावती, परभणी आणि हिंगोली येथुन दंतवैद्यक उपस्थीत होते. या कार्यशाळेला 300 हुन अधिक डॉ.क्टर तसेच 30 पदव्युत्तर विद्यार्थी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमामधे पहिले व्याख्यान डॉ. उदय पवार (कोल्हापूर) यांचे रुट कॅनालवरील त्यांनी निर्माण केलेलं नविन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केलं. या तंत्रज्ञानाने रुट कॅनाल उपचार खुपच सुलभ होतील असं सांगितलं. दुसरे स्पीकर डॉ. मनिष अग्रवाल (मुंबई) यांनी त्यांच्या व्याख्यानामधे सगळे दात किडुन अथवा झिजून गेल्यानंतर त्यावर फुल माउथ रिहॅबीलीटेशन करण्याच्या नवनविन पद्धती वर प्रकाश टाकला.
तिसरे व्याख्यान डॉ. मैत्रीश्‍व व्यास (नागपूर) यांचे होते. त्यांनी दंत उपचारपुर्वी व नंतर फोटो कसे काढायचे आणि त्यांची जपणुक कशी करायची यावर मार्गदर्शन केले. चौथे व्याख्यान डॉ. तृप्ती अग्रवाल (छत्रपती संभाजीनगर) यांचे होते. त्यांनी तुटलेल्या किंवा किडलेल्या दातांवर सौंदर्यवर्धक लॅमीनेटस व विनीअर कसे असावेत याचे वैज्ञानिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगानाने झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र दंत असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजेश गोंधलेकर, यांची उपस्थिती होती. तसेच सि डी एच समन्वयक डॉ. मोतीलाल जांगीड, एस एस एस समन्वयक डॉ. मनीष दागडीया, माजी अध्यक्ष डॉ. विष्णू भंडारी, डॉ. राजेंद्र बिरंगणे प्रिंसीपल पंडीत दिन दयाल दंत महाविद्यालय सोलापूर हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे अध्यक्ष डॉ. शिल्पा लटुरीया, सचिव डॉ. शैलेश पडगीलवार, कोषाध्यक्ष डॉ. साफल्य कडतने, सी डी ई सनमन्वयक डॉ. आनंद अंबेकर सह संपूर्ण आयडीए लातूरचे पदाधिकार्‍यांनी भरपूर मेहनत घेऊन या झोनल परिषदास यशस्वीरित्या पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *