लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ उपसचिव नगरविकास विभाग यांचे पत्र दि.१४/०८/२०२५ अन्वये दि. ०३/०९/२०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर प्रभाग रचनेवर दि. १५/०९/२०२५ दुपारी ३.०० वाजेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुख्य कार्यालयामध्ये ३५ व क्षेत्रीय कार्यालय ब याठिकाणी २ अशा एकूण ३७ हरकती प्राप्त झाल्या असून सदर हरकतीवर दि. १८/०९/२०२५ रोजी जिल्हाधिकारी महोदया, लातूर यांनी प्राधिकृत केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी, लातूर यांचे दालन, खोली क्रमांक २०१, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

