• Thu. Feb 5th, 2026

शेतकरी दांपत्य व माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते तावरजा प्रकल्प जलपूजन संपन्न

Byjantaadmin

Sep 16, 2025

शेतकरी दांपत्य व माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते तावरजा प्रकल्प जलपूजन संपन्न

प्रकल्पाची दुरूस्ती करून बारमाही पाणी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थांकडून  धिरज देशमुख यांचे आभार

लातूर :– लातूर ग्रामीण मधील तावरजा प्रकल्पाची दुरूस्तीचे काम  पूर्णत्वास आले व हा प्रकल्प प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. याचे औचित्य साधून धिरज विलासराव देशमुख तसेच श्री व सौ. नामदेव शिंदे (सावरगाव),श्री व सौ. अंबादास कदम (लखनगाव),श्री व सौ. बब्रुवान मोरे (धानोरी), श्री व सौ. नानासाहेब सूर्यवंशी (उटी खु.)श्री व सौ. काशिनाथ खराबे(उटी बू.) यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन संपन्न झाले.

तावरजा प्रकल्पाचे दरवाजे
नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते.लातूर ग्रामीणचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही महिन्यातच धिरज विलासराव देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने 42 कोटींचा निधी मंजूर करून घेतला व तावरजा प्रकल्प दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करून दिली आता प्रकल्पाची दुरुस्ती झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या पाण्याचा संचय होत आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे सर्वांसाठी हा क्षण स्वप्नपूर्तीचा असल्यामुळे ग्रामस्थ आनंदी व समाधानी आहेत बारमाही पाणी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.

जल पूजन प्रसंगी आपल्या मनोगतात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर तिथे सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात व्हायला हवीत. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले होते. तोच विचार अंगीकारून आपण राजकीय वाटचाल करत असून तावरजा प्रकल्पाची दुरुस्तीसाठी जे काही प्रयत्न करता आले त्यातून शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जाणार असल्याने शेतीसाठी याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. भविष्यात देखील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करणे शक्य आहे ते निश्चितपणे करत राहू असे आश्वासन त्यांनी  याप्रसंगी दिले.

यावेळी २१ शुगरचे  उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, विलास कारखाना माजी व्हा चेअरमन रविंद्र काळे,उपअभियंता नितीन पाटील, ओम थोरमोटे, नागेश तोंडारे, मदन भिसे, भैरवनाथ सुर्यवंशी, नवनाथ काळे, महेश सुर्यवंशी, श्रीनिवास शेळके,सदाशिव कदम, रसुल पटेल,रामदास सुर्यवंशी,महेंद्र मुळे,रामराव ढगे,नानासाहेब जाधव,सचिन शिंदे,दिनकर सुर्यवंशी,अनिल पाटील, दयानंद बिडवे, डाॅ दिनेश नवगिरे, रामानंद जाधव, गणेश ढगे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *