• Thu. Feb 5th, 2026

तेरणेच्या पूराने नुकसानग्रस्त शेती पिकांची आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून पाहाणी

Byjantaadmin

Sep 16, 2025

तेरणेच्या पूराने नुकसानग्रस्त शेती पिकांची आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून पाहाणी

प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश…

औसा;- तेरणा नदीपात्रात झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील उजनी शिवारात तेरणाच्या पाणी घुसून या भागातील शेती पिकांसह दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी सोमवारी सकाळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिले.

रविवारी झालेल्या या पूर परिस्थितीमुळे उजनी व कमालपूर शिवारातील सुमारे साडेतीनशे पेक्षा अधिक हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांसह फळबाग व ऊसाचे नुकसान झाले आहे. तर औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी येथे पाणीवाहून जाण्यासाठी गटार नसल्याने पावसाचे पाणी राधानगर येथे घुसते याही ठिकाणची यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी पाहाणी केली याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी उजनी येथील काही लोकांसह भेट घेऊन याबाबत माहिती देऊन सदरील पाणी शेती किंवा घरात घुसले जाणार नाही याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच उजनी येथील तेरणा नदीच्या पात्रात दोन्ही बाजूने नागरिकांना ये 

जा करण्यासाठी पुल बांधणीच्या संदर्भात पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला जाईल असे सांगितले. यावेळी तहसीलदार यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही असे ते म्हणाले. यावेळी प्रविण  कोपरकर, अरूण मुकडे, चंद्रकांत ढवण, उमाकांत बर्दापूरे, मधुकर रणदिवे, सिध्देश्वर गंगणे, अण्णाराव सुर्यवंशी, धनराज लोखंडे आदीसह गावातील शेतकरी, नागरिक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच याभागातील नुकसीने पाहाणी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही रविवारी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *