• Thu. Feb 5th, 2026

स्वा.रा. ती.म. विद्यापीठाच्या ‘अ’ झोन कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाला दुहेरी यश

Byjantaadmin

Sep 16, 2025

स्वा.रा. ती.म. विद्यापीठाच्या ‘अ’ झोन कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाला दुहेरी यश

निलंगा:  लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ‘अ’ झोन कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुलांचे १५ तर मुलींचे ०६ संघ सहभागी झालेले होते. या स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. यामध्ये कु. आरती माळी, कु. संजीवनी पिटले, कु.प्रतीक्षा धुमाळ, कु. वैष्णवी वाडकर, कु. माफीया राठोड, कु. श्रेया धुमाळ, कु. पूजा बिराजदार, कु. नेहा पांचाळ, कु. प्राजक्ता गायकवाड, कु. प्राची किनीकर, कु. गायत्री घोडके, कु. वर्षा जगळे या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

मुलांच्या संघाने या कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून येणाऱ्या काळात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी सहभाग निश्चित केला. यात आकाश लंगोटे, रोमन तांबोळी, ओंकार बिराजदार, किरण सोळुंके, स्वप्निल सुरवसे , आदित्य मोकळे, इद्रिस शेख, धीरज कांबळे, केशव कुंभार, विश्वजीत सोळुंके, सुमित पाटील, अल्ताफ पटेल या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांमधून वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय येथे होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी आकाश लंगोटे, रोमन तांबोळी, ओंकार बिराजदार, कु.आरती माळी, कु.संजीवनी पिटले, कु.प्रतीक्षा धुमाळ या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या या दुहेरी यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम, उपप्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.अजित मुळजकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख डॉ. गोपाळ मोघे यांचे तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. विष्णू रेडी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *