• Thu. Feb 5th, 2026

विद्यापीठस्तरीय ‘अ’ झोन बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाचा मुलांचा संघ द्वितीय

Byjantaadmin

Sep 15, 2025

विद्यापीठस्तरीय ‘अ’ झोन बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाचा मुलांचा संघ द्वितीय

निलंगा:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ‘अ’  झोन बास्केटबॉल स्पर्धेचे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.देशमुख  यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कर्मवीर कदम यांची उपस्थिती होती. तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, ‘अ’ झोन सचिव डॉ. प्रशांत चव्हाण , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष डॉ.कैलास पाळणे 

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.गोपाळ मोघे, निवड समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध बिराजदार, आदित्य माने, गणेश मनगिरे, प्रा. बालाजी हालसे  डॉ .अजित मुळजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत मुलांचे सात  व मुलींचे चार संघ सहभागी झाले होते. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुलांमध्ये प्रथम राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर,  द्वितीय महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा,  तर तृतीय कॉक्सिट कॉलेज, लातूर . यांनी स्थान पटकाविले . तर मुलींमध्ये प्रथम,राजश्री शाहू कॉलेज, लातूर , द्वितीय दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर . व दयानंद विज्ञान महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम,क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या संघांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *