आयुक्तांनी केली गोडाऊनची पाहणी सिंगल युज प्लास्टिकचा १ टन साठा जप्त केला
लातूर/ प्रतिनिधी: शनिवार दिनांक १३.०९.२०२५ रोजी आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी हत्ते नगर येथील एका सिंगल युज प्लास्टिक गोडाऊनची पाहणी करून सिंगल युज प्लास्टिकचा जवळपास १ टनचा साठा जप्त केला करण्यात आला. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख साहेब, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे,धोंडीराम सोनवणे,शिवराज शिंदे,अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक प्रदिप गायकवाड,अमजद शेख व कर्मचारी उपस्थीत होते
शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी आहे.असे असतानाही काही व्यावसायिक व नागरिकांकडून हे प्लास्टिक वापरले जाते. पालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे संबंधितांना आर्थिक दंडही केला जात आहे.
प्लास्टिकचा वापर वाढत आहे. व्यावसायिक आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी या प्लास्टिकचा वापर बंद करावा,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिक वापर बंद केला नाही तर पालिकेची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

