• Thu. Feb 5th, 2026

जागा उपलब्ध करून द्या पोलिस ठाण्याची इमारत बांधू – अमोल तांबे

Byjantaadmin

Sep 15, 2025

जागा उपलब्ध करून द्या पोलिस ठाण्याची इमारत बांधू – अमोल तांबे

निलंगा:- औराद शहाजानी लातूर जिल्ह्यातील एकमेव औराद येथील पोलीस ठाण्यास स्वतःच्या मालकीची इमारत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पोलीस ठाण्यास ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी योग्य जागा सुचवून उपलब्ध करून द्यावी. शासकीय पातळीवर इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे. योग्य जागा मिळाल्यास तात्काळ इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे औरदकरांना आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिले.

औराद शहाजानी येथील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त आले असता ग्रामस्थ व व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुम्मे उपस्थित होते. पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापारी व ग्रामस्थांतर्फे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुम्मे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी गणपतराव गणापुरे, सतीश देवणे, अशोक धबाले, शिवाजी शिंदे, माजी सरपंच मोहन भंडारे, माजी जि. प. सदस्य नागनाथ बगदुरे, दिलीप कत्ते, वीरपाक्षेश्वर स्वामी, डॉ. मलिकार्जुन शंकद, कुमार मंडगे, सोमनाथ आंबुलगे, रवींद्र गायकवाड

दिगंबर अंतरेड्डी, बालाजी भंडारे आदींसह नागरिक उपस्थित होते. सत्काराला देताना अमोल तांबे म्हणाले, शाश्वत सुरक्षा देण्याकरिता पोलीस प्रशासनाला सुसज्ज इमारत, पुरेसे मनुष्यबळ आणि वेळेत घटनास्थळी पोहोचण्यासाठी अद्यावत इमारत, पु वाहन व्यवस्था ही जिव्हाळया अधाइन असते. औराद येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सवातील इतर खर्च टाळून शहरात ३० कॅमेरे बसविल्याबद्दल संबंधित गणेश मंडळाचे पदाधिकारी व विश्वस्तांचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस अमलदारांचा दरबार घेऊन वार्षिक तपसणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *