विरोधी पक्षाची सरकारविरोधात घोषणाबाजी
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज ( २६ नोव्हेंबर ) सुरु होणार आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपाने शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना घेरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नागपूरात दाखल झाले आहे. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन यावरूनही दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरु केली आहे. कर्नाकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच, ‘खाऊन खाऊन ५० खोके माजलेत बोके’, ‘निर्लज्ज सरकार, मिंधे सरकार’, ‘बोम्मईसमोर माना खाली घालणाऱ्या सरकार हाय हाय’, अशी घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत.