लातूर ;- याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०५/०९/२०२५ रोजी २१.४५ वाजण्याच्या सुमारास कंळब रोड, रेल्वे गेट, लातूर येथील एका हॉटेलवर काही आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादीस तु आमच्या कडे डोळे वटारून का बघत आहेत असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीस कत्तीने व फरशीने मारहाण करून गंभीर दुखापत केली, कत्तीचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे. गुन्हा क्रमांक ६८६/२०२५ कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२,१८९(२), १९१(१), १९१(२),१९१(३), १९० भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधनियम १९५१-
दिनांक ०६/०९/२०२५ प्रमाणे ७ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन सदरचे आरोपी हे फरार झाले होते.सदर गुन्हयात श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातुर, यांनी गुन्ह्यातील मारहाण करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या फरार आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन अटक करण्यासाठी आदेशित केले होते.
श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातुर, श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी विविध ठिकाणी शोध घेवुन व कसुन तपास करुन गोपनिय बातमीदारांकडुन माहीती संकलीत करुन गुन्हयातील ७ आरोपीतांपैकी आरोपी नामे
१) श्याम सुरेश पवार रा. वरवंटी
२) शुभम प्रदीप राठोड रा. हरगुंळ खु.
३) अभिषेक सामलिंग चिकटे रा. वरवंटी
४) प्रेम बापु जाधव रा. आवंती नगर लातूर
५) शुभम विनायक गायकवाड रा. शासकीय कॉलनी बार्शी रोड लातूर
यांना दिनांक १०/०९/२०२५ रोजी ताब्यात घेऊन नमूद गुन्हा त्यांनी ज्या ठिकाणी कत्ती ,कोयत्याने मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी ताब्यातील आरोपींना घेऊन जाऊन तपास करण्यात आला असून आरोपीना दिनांक ११/०९/२०२५ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपीतांना दिनांक १४/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे करीत आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सफौ भिमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार बळवंत भोसले, राजु मस्के,अक्षय डिगोळे, विश्वंभर तुरे यांनी केली आहे.किरकोळ कारणावरून हातात कत्ती घेऊन मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या फरार आरोपींना अखेर अटकयाबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०५/०९/२०२५ रोजी २१.४५ वाजण्याच्या सुमारास कंळब रोड, रेल्वे गेट, लातूर येथील एका हॉटेलवर काही आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादीस तु आमच्या कडे डोळे वटारून का बघत आहेत असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीस कत्तीने व फरशीने मारहाण करून गंभीर दुखापत केली, कत्तीचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे. गुन्हा क्रमांक ६८६/२०२५ कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२,१८९(२), १९१(१), १९१(२),१९१(३), १९० भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधनियम १९५१-
दिनांक ०६/०९/२०२५ प्रमाणे ७ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन सदरचे आरोपी हे फरार झाले होते.
सदर गुन्हयात श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातुर, यांनी गुन्ह्यातील मारहाण करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या फरार आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन अटक करण्यासाठी आदेशित केले होते.
श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातुर, श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातुर हर यांचे मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी विविध ठिकाणी शोध घेवुन व कसुन तपास करुन गोपनिय बातमीदारांकडुन माहीती संकलीत करुन गुन्हयातील ७ आरोपीतांपैकी आरोपी नामे
१) श्याम सुरेश पवार रा. वरवंटी
२) शुभम प्रदीप राठोड रा. हरगुंळ खु.
३) अभिषेक सामलिंग चिकटे रा. वरवंटी
४) प्रेम बापु जाधव रा. आवंती नगर लातूर
५) शुभम विनायक गायकवाड रा. शासकीय कॉलनी बार्शी रोड लातूर यांना दिनांक १०/०९/२०२५ रोजी ताब्यात घेऊन नमूद गुन्हा त्यांनी ज्या ठिकाणी कत्ती ,कोयत्याने मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी ताब्यातील आरोपींना घेऊन जाऊन तपास करण्यात आला असून आरोपीना दिनांक ११/०९/२०२५ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपीतांना दिनांक १४/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सफौ भिमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार बळवंत भोसले, राजु मस्के,अक्षय डिगोळे, विश्वंभर तुरे यांनी केली आहे.