डॉ.ज़ैद फिजिओथेरपी मध्ये निरोगीपणाच्या भावनेचे पुनरुज्जीवन – जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा
उदगीर : उदगीर शहरात फिजिओथेरपीची ओळख करून देत, हजारो रुग्णांना पुन्हा चालण्यास व सक्रिय जीवन जगण्यास मदत करणारे डॉ. ज़ैद हमजा शेख (डॉ.ज़ैद फिजिओथेरपी) यांनी आपला ११ वर्षांचा बेमिसाल प्रवास नुकताच साजरा केला. त्यांच्या अथक सेवेमुळे उदगीर व आसपासच्या परिसरात फिजिओथेरपी उपचारांची लोकप्रियता प्रचंड वाढली असून, ते या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह नाव ठरले आहेत.१० हजारांहून अधिक रुग्णांना दिला दिलासा

पॅरालिसिस, कंबरदुखी, गुडघेदुखी, मेंदूविकार, फ्रोजन शोल्डर, अपघातानंतरची समस्या तसेच ऑपरेशननंतरची काळजी अशा विविध आजारांवर डॉ. ज़ैद यांनी आपल्या कौशल्याने व फिजिओथेरपी उपचारांनी १० हजारांहून अधिक रुग्णांना चालणे, फिरणे आणि सामान्य जीवन जगण्यास सक्षम केले आहे.
सामाजिक कार्यातही अग्रेसर
डॉ. ज़ैद हे फक्त एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट नसून सामाजिक कार्यातही अग्रणी आहेत. सद्भावना मंच, गोरगरीबांना मदत, विविध सामाजिक संस्था व कार्यक्रमांमध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थितीया विशेष सोहळ्यास अनेक सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. सद्भावना मंच अध्यक्ष विजयकुमार पाटील एकमबेकर, डॉ. असगर शेख, डॉ. इरफान हाशमी, डॉ. बडीराम भक्तारे, रसिक कॉलेजचे गोविंदराव भोपनेकर, डॉ. अनिल भीकाने यांच्यासह उदगीरमधील सर्व फिजिओथेरपिस्ट आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले.
‘आरोग्यदायी वार्धक्य’ थीमवर विशेष चर्चा
जागतिक फिजिओथेरपी दिनाचे यावर्षीचे “निरोगी वृद्धत्व – आरोग्यदायी वार्धक्य” हे थीम लक्षात घेऊन डॉ. ज़ैद यांच्या सहधर्मचारिणी श्रीमती शुमैय्सा यांनी महिलांमध्ये वाढणाऱ्या शारीरिक समस्यांवर व फिजिओथेरपीच्या गरजेवर गंभीर विचार मांडला.
उदगीरमध्ये वाढली फिजिओथेरपीबद्दल जागरूकता
या कार्यक्रमामुळे फिजिओथेरपीविषयी उदगीर आणि परिसरात अधिक जागरूकता निर्माण झाली असून, डॉ. ज़ैद यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात फिजिओथेरपीची ओळख अधिक ठळक करणार, अशी उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केली.