मुख्यमंत्री पंचायत राज समृध्द अभियान ; तालुकास्तरीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा संपन्न
निलंगा(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री पंचायत राज समृध्द अभियान सन 2025-2026 अंतर्गत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक, इ.ची तालुकास्तरीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह निलंगा येथे पार पडली.
सदर कार्यशाळेसाठी माजी जिल्हा परिषद सभापती श्रीमती. भारतबाई सोळुंके जि.प.लातूर, श्री. दगडु वाघमारे माजी जि.प. सदस्य, श्री. धोंडीराम बिराजदार सोळुंके चेअरमन, श्री. संतोष वाघमारे माजी जि.प.सदस्य, श्री.वामन भालके माजी पं.सदस्य, श्री. कुमोद लोभे, श्री. सुरेश बिराजदार इ. सन्माननीय उपस्थित होते.सर्वप्रथम श्री. सोपान अकेले गटविकास अधिकारी पपंचायत समिती निलंगा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन केले. तसेच श्री. दत्ता खटके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री. संजय आडे,श्री एजाज मौजन यांनी विषयांचे अनुषंगाने सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात श्री. सोपान अकेले गट विकास अधिकारी पंचायत समिती निलंगा यांनी सदरील अभियानाची उदिष्टे व, भुमिका व जबाबदा-या या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यशाळेत नंतर ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत नियोजन करणेबाबत सांगीतले.सदर कार्यशाळेसाठी पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख, विस्तार अधिकारी (सर्व), शाखा अभियंता (सर्व) व ग्रामपंचायत अधिकारी (सर्व), सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक इ. कर्मचारी/लोकप्रतिनिधी हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्री. मोहळकर बालाजी क.प्र. अधि., श्री. सुर्यवंशी आर.एच. व श्री. बळवंते एस.ए.वि.अ.पं., श्री. गणेश कुलकर्णी व.सहा., इ. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
