जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन
मालमत्ताधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तडजोडीअंति थकीत कर भरणा करावा – आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांचे आवाहन

लोकअदालत दिं.१३ सप्टेंबर २०२५ स्थळ लातूर शहर महानगरपालिका,मुख्य कार्यालय,लातूर
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील अद्यापही काही थकबाकीदार आपला मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाणे वसुलीची धडक मोहीम राबवित आहे. तसेच मालमत्ताकराची व पाणी पट्टी कराची थकबाकी मोठया प्रमाणात वसूल होणे बाकी असल्याने सदरील प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालात मध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिं.१३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सांय. ५.०० वा.पर्यंत लातूर महानगरपालिका,मुख्य कार्यालय लातूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर लोक अदालतमध्ये मालमत्ताकर वसूलीची वादपुर्व प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात येणार असल्याने, थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवुन आपल्याकडे देय असलेल्या मालमत्ताकराची व पाणी पट्टी कराच्या थकीत रक्कमेचा एकरक्कमी भरणा करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी केले आहे.