देव तारी त्याला कोण मारी, या युक्तीप्रमाणे डॉ. अहंकारी यांनी देवदूत बनवून सरपंच स्वरूप धुमाळ यांचे प्राण वाचवले.
डॉ. अहंकारी यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव.
निलंगा:- देव तारी त्याला कोण मारी, या युक्तीप्रमाणे डॉ. श्रीधर अहंकारी यांनी जिवापाड शर्यतीचे प्रयत्न करून शेडोळ येथील लोकनिर्वाचित लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ हे अगदी मृत्यूच्या जवळ गेले होते. मात्र डॉ. अहंकारी यांनी व त्यांच्या टीमने मृत्यूची झुंज देत असलेले लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाली असून. त्यांच्या या धाडसांचे संपूर्ण तालुका स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेडोळ येथील लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांना गावाकडून निलंग्याकडे येत असताना वाटेतच एक भयानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्या झटक्यामध्येच धुमाळ हे बेसूद अवस्थेत असताना अवघ्या पाच मिनिटाच्या फरकाने त्यांना डॉ. अहंकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. अहंकारी यांच्या अथक परिसर व त्यांच्या टीमने मृत्यूची झुंज देत असलेले लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांचे प्राण वाचवण्यात त्यांना खूप मोठे यश आले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धुमाळ यांना पुढील उपचारांसाठी लातूर येथील दुबे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत पूर्वपदावर आली असून ते गावी आल्यानंतर सरपंच स्वरूप धुमाळ यांच्या संपूर्ण परिवारासह तालुक्यातील सरपंच मित्र परिवाराच्यावतीने डॉ. अहंकारी यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे धुमाळ परिवाराच्यावतीने भव्य सत्कार करून परिवाराने डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त करून जाहीर आभार मांडले. यात डॉ. श्रीधर अहंकारी, केशव बेंबडे, सुनील जाधव यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला जि प चे मा. सदस्य तथा चेअरमन व्यंकट आप्पा धुमाळ, सिंधी जवळग्याचे सरपंच अंगद सुरवसे, काटेजवळगा येथील सरपंच शरद सोमवंशी, योगेश सोळंके, साहेबराव हरणे, ऋतिक पवार, शंकर पेटकर, संतोष माळी, गणेश तूगावे, पत्रकार संघाचे सचिव झटिंग अण्णा म्हेत्रे, पत्रकार विशाल हलकीकर पत्रकार गोविंद सुरवसे, पत्रकार परमेश्वर शिंदे, पत्रकार अस्लम झारेकर, पत्रकार साजिद पटेल यांच्यासह शेकडो मित्रपरिवार या कृतज्ञ सोहळ्याला उपस्थित होते.
