निलंगा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या..डॉ नरसिंह भिकाने

निलंगा – लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त झाला असून या शेतकऱ्याला सरकारने तातडीची एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी प्रशासनाकडे निलंगा कासारसिरसी मार्गावरील दादगी मोड येथे केलेल्या रास्तारोको आंदोलनादरम्यान बोलताना केली आहे.यावेळी मोठया संख्येने मनसे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या या नुकसानी कडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांची माती,जनावरे, घरे,रस्ते वाहून गेल्यामुळे त्याच्यासमोर आत्महत्ये शिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे सांगून तात्काळ सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली.शेवटी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आले.दीर्घ काळ चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याकारणाने पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही कार्यवाही केली.सरकारने तातडीने मदत न केल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांनी यावेळी दिला आहे.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार,माजी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,प्रदीप शेळके,तालुका सचिव गणेश उसनाळे,तालुकाउपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, बालाजी पवार,सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोळे, सोमलिंग पाटील,कृष्णा सुरवसे, शुभम माने, बालाजी खिचडे, नर्सिंग महालिंग, महेश सावनगिरे, राहुल पाटील, मल्लिकार्जुन कुरळे, जीवन बोरुळे, व निलंगा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.