• Mon. Sep 8th, 2025

निलंगा येथे ईद -ए- मिलाद निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न; शिबिरात 130 जणांनी केले रक्तदान…. 

Byjantaadmin

Sep 8, 2025
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 103.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;

निलंगा ;- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निलंगा शहरात ईद -ए- मिलाद (पैगंबर जयंती) निमित्ताने ईद-ए-मिलादूनबी कमेटी निलंगा च्या वतीने शहरातील औरंगपुरा येथील जुने मार्केट यार्ड   येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पीरपाशा दर्गा चे सज्जदे सय्यद युसुफ जानी काद्री यांच्या हस्ते करण्यात आले.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ब्रिद वाक्य प्रमाणे काम करून दाखवले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ईद-ए-मिलादूनबी या सणानिमित्त दि. 8 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 130 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला संदेश देण्यात आला आहे. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी खालील तिलगुरे, असगर अन्सारी, नसीम खातिब, इम्रान सय्यद, सबदर कादरी, बाबा बिबराले, खारी गुलाम गौस,खारी हबीब, समद सत्तारी, वसीम अत्तार, मोहम्मद शेख यांच्यासह ईद-ए-मिलादूनबी कमेटी निलंगा चे सदस्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

केळगाव येथे  ५० जणांचे रक्तदान

 निलंगा तालुक्यातील केळगाव येथील खिदमत – ए – इन्सानियत फाउंडेशन व युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए मिलादुन्नीबी निमित्त ए.पी. जे. अब्दुल कलाम चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उ‌द्घाटन मुश्ताक पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रेषित मुहम्मद सागर आले या यांनी विचारावर प्रकाश टाकला. शिबिराच्या यशस्वितेसाठी खिदमत-ए-इन्सानियत फाउंडेशनचे शफीक शेख, सहील मुळे, मन्सूर शेख, शाहरुख मुजावर, मोहसीन पांढरे, इनुस पांढरे, इम्रान पटेल, मदार माकणे, आसिफ पटेल, अझर शेख, आशिफ शेख, असद आसिफ मुजावर, जोहर पांढरे, इस्माईल अरबाज पटेल, मलंग शेख सह इतर समाजातील परिश्रम घेतले.

हलगरा  येथे ६५ जणांचे रक्तदान

तालुक्यातील हलगरा येथील जामा मज्जिदमध्ये ईद ए मिलादनिमित्त ६५ मुस्लिम बांधवांनी रक्तदान करुन समाजपयोगी उपक्रम राबविला.जामा मज्जिदचे प्रमुख तथा हलगरा येथील माजी सरपंच समियोद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मुस्लिम समाजातील युवकांनी ईद ए मिलादनिमित्त शनिवारी रक्तदान शिबीर घेतले. जामा मज्जिद येथे आयोजित शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. माऊली ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले.रक्तदात्याला प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व मुस्लिम समाजातील युवकांनी सहभाग घेतसामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *