• Mon. Sep 8th, 2025

हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी कोळी महादेव समाजाचा एल्गार मेळावा 

Byjantaadmin

Sep 8, 2025

……..

निलंगा : मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करणेसाठी दादगी  ता. निलंगा येथे कोळी महादेव समाजाचा एल्गार मेळावा रविवारी ता. ७ रोजी पार पडला. यावेळी मेळाव्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार मेळावा झाला या मेळाव्यात आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी यांना १९५० पूर्वीचा ‘कोळी’ नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यासह विविध मागण्यासाठी या गेल्या वर्षभरापासून जलसमाधी आंदोलन,  लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, निलंगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी दंडवत आंदोलन त्यानंतर नऊ दिवस अन्नत्याग उपोषण अशी वेगवेगळी आंदोलन या समाजाने लातूर जिल्ह्यामध्ये केली आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यावर असतानाही त्यांना निवेदनही देण्यात आले परंतु आजपर्यंत या समाजाचा प्रश्न सुटला नाही15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा (निजाम राज्य ) भारतामध्ये समाविष्ट झाला.  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा, नळदुर्गचा भाग, गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅजेटमध्ये आहे.

राज्य शासनाने मराठा समाजाला नुकतेच हैदराबादचे गॅजेट लागू केले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून मराठवाड्यातील कोळी महादेव व मल्हार कोळी या समाजाकडून हैदराबाद गॅझेटमधील सर्व शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन केले असता *कोळी महादेव व कोळी मल्हार* या जमातीचे मूळ वस्तीस्थान हे तत्कालीन हैदराबाद (निजाम) राज्यातील म्हणजेच आताच्या मराठवाड्यातील बालाघाट- महादेव व अजिंठा डोंगर रांगा असल्याचे सिद्ध होते. तसेच हैदराबाद राज्यात म्हणजेच आताच्या मराठवाड्यात कोळी ही मुख्य जमात आहे. कोळी महादेव व कोळी मल्हार या  दोनच जमाती या भागात आढळतात असा स्पष्ट उल्लेख आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी, मराठा-कणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे. तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्यास 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी  जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी कोळी महादेव समाजाचा एल्गार मेळावा 

……..

निलंगा : मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करणेसाठी दादगी  ता. निलंगा येथे कोळी महादेव समाजाचा एल्गार मेळावा रविवारी ता. ७ रोजी पार पडला. यावेळी मेळाव्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार मेळावा झाला या मेळाव्यात आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी यांना १९५० पूर्वीचा ‘कोळी’ नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यासह विविध मागण्यासाठी या गेल्या वर्षभरापासून जलसमाधी आंदोलन,  लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, निलंगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी दंडवत आंदोलन त्यानंतर नऊ दिवस अन्नत्याग उपोषण अशी वेगवेगळी आंदोलन या समाजाने लातूर जिल्ह्यामध्ये केली आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यावर असतानाही त्यांना निवेदनही देण्यात आले परंतु आजपर्यंत या समाजाचा प्रश्न सुटला नाही

…..

15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा (निजाम राज्य ) भारतामध्ये समाविष्ट झाला.  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा, नळदुर्गचा भाग, गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅजेटमध्ये आहे.

राज्य शासनाने मराठा समाजाला नुकतेच हैदराबादचे गॅजेट लागू केले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून मराठवाड्यातील कोळी महादेव व मल्हार कोळी या समाजाकडून हैदराबाद गॅझेटमधील सर्व शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन केले असता *कोळी महादेव व कोळी मल्हार* या जमातीचे मूळ वस्तीस्थान हे तत्कालीन हैदराबाद (निजाम) राज्यातील म्हणजेच आताच्या मराठवाड्यातील बालाघाट- महादेव व अजिंठा डोंगर रांगा असल्याचे सिद्ध होते. तसेच हैदराबाद राज्यात म्हणजेच आताच्या मराठवाड्यात कोळी ही मुख्य जमात आहे. कोळी महादेव व कोळी मल्हार या  दोनच जमाती या भागात आढळतात असा स्पष्ट उल्लेख आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी, मराठा-कणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे. तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्यास 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी  जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *