मराठवाड्यातील आदिवासी ‘कोळी महादेव’ समाज करणार १७ सप्टेंबरला तिव्र ‘निषेध’ आंदोलन
निलंगा : 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा (निजाम राज्य ) भारतामध्ये समाविष्ट झाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा, नळदुर्गचा भाग, गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅजेटमध्ये आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ७८ वर्षातही या जमातीला अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे वतीने मागणी करण्यात येते की, मराठा समाजा प्रमाणे कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीला हैदराबाद गॅझेट लागू करावे अशी मागणी आंदोलनकर्ते चंद्रहास नलमले यांनी केली आहे.
राज्य शासनाने मराठा समाजाला नुकतेच हैदराबादचे गॅजेट लागू केले आहे. कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळून शैक्षणिक व नोकरीसाठी आरक्षण मिळणार आहे. परंतु गेल्या ३० ते ३५ वर्षापासून मराठवाड्यातील कोळी महादेव व मल्हार कोळी या समाजाकडून हैदराबाद गॅझेट, हैद्राबादचे लोक* लेखक र.मू. जोशी. (1954) सर्व शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन केले असता *कोळी महादेव व कोळी मल्हार* या जमातीचे मूळ वस्तीस्थान हे तत्कालीन हैदराबाद (निजाम) राज्यातील म्हणजेच आताच्या मराठवाड्यातील बालाघाट- महादेव व अजिंठा डोंगर रांगा असल्याचे सिद्ध होते. तसेच हैदराबाद राज्यात म्हणजेच आताच्या मराठवाड्यात कोळी ही मुख्य जमात अंतर्गत कोळी महादेव व कोळी मल्हार या दोनच जमाती आढळतात असा स्पष्ट उल्लेख आहे मराठवाड्यातील या दोन्ही जमातीच्या बांधवांना मा. उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर, मा. उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात पडताळणी समितींना वैधता देण्याचे आदेश अनेक प्रकरणात दिले आहे.
महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये एकुण ४७ जमाती येतात परंतु ३३ जमातीला त्या प्रवर्गात राहून आजही न्याय मिळत नाही. हा लाभ केवळ आदिवासी क्षेत्रातील २४ आमदारांना मिळतो आहे. त्यामध्ये पालघर, नंदूरबार, शहादा, अक्कलकुवा, साक्री, शिरपूर, मधुकर पिचड यांचा अकोले मतदार संघ असे ठराविक आमदार घेतात. त्याच्या नोंदी कोळी असूनही महादेव कोळी प्रमाणपत्र व वैधता सहज मिळवतात.परंतु उर्वरित वंचित जमातीला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीकडून वैधता मिळत नाही त्यामध्ये विशेषतः कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, डोंगरे कोळी यासह आदी जमातीचा समावेश आहे.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनाची दख्खल घेऊन स्वतंत्र मराठवाड्यासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी, मराठा-कणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे. तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करावा अशी मागणी आम्ही करत आहोत जर ही मागणी मान्य नाही झाल्यास १७ सप्टेंबर २०२५ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी आठही जिल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करणार आहोत याची शासनाने दख्खल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे वतीने वर्षभरात आजपर्यंत जलसमाधी आंदोलन, श्रावण महिन्यात मुंडन आंदोलन, दंडवत आंदोलन, नऊ दिवस अन्नत्याग उपोषण असे आंदोलन केले होते.
