महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदवी प्रदान सोहळा
निलंगा(प्रतिनिधी):- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०९-०९-२०२५ रोजी हिवाळी २०२३ व उन्हाळी २०२४ परीक्षेतील पदवी व पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रदवी प्रदान सोहळा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह, निलंगा येथे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. अशोक महाजन व जेष्ठ पत्रकार तथा कवि डॉ. विजय चोरमारे यांची उपस्थिती राहणार आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक्रमाची पदवी घेऊन शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी क्षेत्रात आपले नावलौकिक करतील त्यामुळे त्यांच्या जिवनातील एक अविस्मरणीय क्षण म्हणून हा पदवी प्रदान सोहळा संपन्न होत आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सिध्देश्वर पाटील, परीक्षा प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड व डॉ. चंद्रवदन पांचाळ हे उपस्थित राहणार आहेत.
हिवाळी २०२३ व उन्हाळी २०२४ परीक्षेतील पदवी व पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहून पदवी स्विकारण्याचे अवाहन दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.
