बळवंतराव जोतीराम कदम यांच्या स्मरणार्थ मुलींच्या वसतिगृहाला एक लाखाची देणगी
निलंगा:- निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा गावचे रहिवासी. लातूरला स्थायिक असलेले बळवंतराव कदम यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते .ते जिल्हा परिषदेला शिक्षक, मुख्याध्यापक, व केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच निलंगा पतसंस्थेचे ते डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. अनेक सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम त्यांच्या कालावधीत राबवली गेले होते. म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पुष्पा बळवंतराव कदम, चिरंजीव अतुल बळवंतराव कदम, निता बळवंतराव कदम ,व वर्षा बळवंतराव कदम,विधीतम साळुंके, प्रणिता अतुल कदम, आयन अतुल कदम, दीपक साळुंके यांनी लातूर येथील मराठा सेवा संघाच्या मुलींच्या वस्तीगृहासाठी एक लाखाची देणगी प्रथम पुण्यस्मरण निमित्त मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक शिवश्री लिंबराज सूर्यवंशी अध्यक्ष रोहन जाधव सचिव जाधव एम एम यांच्याकडे व टीमकडे सुपूर्द केला. यावेळी लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जाधव निवृत्ती ,कीर्तनकार काळे बाळकृष्ण,मराठा सेवा संघाचे वैभवदादा तळेकर,ऋषी कदम , जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे बरमदे डी.बी.जिजाऊ ब्रिगेडच्या बोराडे ताई, समाधान माने, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जाधव डी व्ही, जाधव ए पी, प्रभाकर जाधव, बरमदे आर एन, हंगारगे पी एस, कमलाकर सूर्यवंशी, शिवाजीराव पाटील व कदम परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.
