माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली पाहणी…
निलंगा
मांजरा नदीच्या वाढलेल्या जलपातळीमूळे धनेगावसह आसपासच्या परिसरात पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज शनिवारी या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. बाधित कुटुंबियांशी संवाद साधून सर्वांना धीर व पूर्ण सहकार्याचे वचन दिले.
परिस्थती बिकट आहे. परंतु आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ व यातून मार्ग काढूया, असा विश्वास सर्वांना दिला. याचबरोबर मांजरा धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क तसेच प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वांना केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, देवणी तहसिलदार सोमनाथ वाडकर, गट विकास अधिकारी पंचायत समिती सोपान अकेले, देवणी पोलीस निरीक्षक गायकवाड , जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, सुमित ईनानी, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, देवणी तालुकाध्यक्ष शिवराज बिरादार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, राज गुणाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष रामलिंग शेरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
