• Wed. Aug 27th, 2025

पोलिसांच्या अटीशर्तींसह परवानगीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

Byjantaadmin

Aug 27, 2025

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला मोर्चा घेऊन निघाले आहेत. त्यांच्या मोर्चाला उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी होताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांचा 29 मार्चला आझाद मैदानावर मोर्चा आणण्याचा मानस आहे. पण सध्या गणेशोत्सव असल्याने मुंबईत भाविकांची मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकला तर वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवू शकते. तसेच यंत्रणांवरही ताण येऊ शकते. यामुळे या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना 29 तारखेच्या आझाद मैदानावरील मोर्चाला काल परवानगी दिली नव्हती. पण मुंबई पोलिसांनी आज अटीशर्तींसह एक दिवसाच्या आंदोलनास मान्यता दिली आहे. केवळ एक दिवसासांठी मान्यत देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“आझाद मैदानावर परवानगी दिली असेल तर कायद्याचे सर्व नियम आम्ही पाळू. आम्ही नियमांच्या बाहेर जाणार नाहीत. पण ती ऑर्डर काय आहे ते मला माहिती नाही. आम्ही 29 ऑगस्टला आझाद मैदानात सकाळी 10 वाजता आंदोलनाला बसणार आहे. लोकशाही आणि कायद्याच्या सर्व नियमांचे मी पालन करणार आहे. आम्ही हट्टी नाहीयत. त्यांनी जे सांगितलं आहे त्या निर्णयांचं तंतोतंत मराठ्यांकडून पालन होणार. पण एकदिवसांचं नाही तर बेमुदत आंदोलन करणार. बाकी जेवढे त्यांचे नियम आहेत त्या नियमांचे पालन करणार आहोत”, असं प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

“मी संध्याकाळी शिवनेरी गडावर गेल्यानंतर पूर्ण ऑर्डर बघतो. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला प्रतिक्रिया देतो. पण सरकारचे आणि न्यायालयाचे पुन्हा एकदा आभार मानतो”, असं मनोज जरांगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *