राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मंडल यात्रेचे निलंगा येथे जल्लोषात स्वागत
निलंगा – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर नागपुर हुन चालु झालेली भर मंडल यात्रा ही आज वाजत गाजत फटाकेटी आतषबाजी मध्ये निलंगा येथे पोहोचली या यात्रेचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर हे करत आहेत.निलंगा येथे आगमण होताच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन सुरुवात झाली या यात्रेचे मागासवर्गीय मराठवाडा सेल चे अध्यक्ष प्रास्ताविक लक्ष्मण कांबळे यांनी केले.
भाजपा वर टिकेची झोड उठवत राष्ट्रीय अध्यक्ष युवती सेलच्या सक्षणा सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व्होट चोरी करुन आलेले हे सरकार चोर आहे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. तसेच मराठा समाज सुध्दा आरक्षणापासुन वंचित नसला पाहिजे अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांनी व्यक्त केली तसेच मनोजदादा जरांगे पाटिल यांच्या भुमिकेला पांठिबा दर्शविला.यावेळेस संभाजी (मालक) पाटील यांनी समर्थन दिले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिरुर अनंतपाळ चे संभाजी(मालक) पाटिल, तालुकाध्यक्ष सुधीरदादा मसलगे, ,युवक चे तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, शहराध्यक्ष ईफरोज शेख,मा.जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव,प्रदेशचे किरण सोळुंकेे,युवक शहराध्यक्ष रोहन सुकाले,मुसा पठाण, सचिन राजनाळे ,अभय चौधरी जिल्हा कार्यकारिणी चे इंजि.विनायक बगदुरे, ईस्माईल लदाफ,संदीप मोरे, यशवंत पवार,अलिबाबा,व्यंकट सूर्यवंशी,लक्ष्मण क्षीरसागर, रामदास कोकरे,फारुक पांढरे,फारुक शेख,यासह शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते
