• Wed. Aug 27th, 2025

सफाई ठेका बंद करा अन्यथा मंत्रालय वर मोर्चा

Byjantaadmin

Aug 27, 2025

सफाई ठेका बंद करा अन्यथा मंत्रालय वर मोर्चा

 निलंगा – निलंगा नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री बलभीम शेंडगे यांनी निलंगा नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांची एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या१) सफाई ठेका पद्धती बंद करणे २)प्रत्येक सफाई कामगारांना मोफत घर ३)स्वच्छता निरीक्षकाची वेतन श्रेणी 2800 4200 करणे ४)नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करणे ४)2006 पासून बंद असलेली वेतन वाढ  आगाऊ वेतनवाढीची थकबाकी सह लाभ देणे ५)कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे इत्यादी मागण्या संदर्भात मार्गदर्शन केले व मुंबईच्या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले याप्रसंगी निलंगा नगर परिषदेचे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना अध्यक्ष निलंगा श्री प्रेमनाथ गायकवाड यांनी सर्व कर्मचारी यांना मोर्चा संदर्भात व विविध मागण्या संदर्भात माहिती देऊन सर्व कर्मचारी मोर्चाला हजर राहणार आहेत अशी ग्वाही दिली .या बैठकीस निलंगा नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक कमलाकर सरवदे,  लेखापाल चनवडे , विवेक शाहीर, विक्रम शिंदे ,दिलीप गंभीरे ,जफर अन्सारी ,प्रकाश गायकवाड, दीपक आनंतवाळ, विकास पवार, दत्ता गायकवाड , शिवाजी शेळगे ,रमेश कदम,गीतांजली गायकवाड ,बकुलाबाई कांबळे कोमल कदम इत्यादी अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *