• Wed. Aug 27th, 2025

मोफत ब्यूटीपार्लर प्रशिक्षण केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमतीवैशालिताई विलासराव देशमुख यांची भेट

Byjantaadmin

Aug 27, 2025

विलासराव देशमुख फाउंडेशन कडून बाभळगाव येथे सुरू केलेल्या मोफत ब्यूटी
पार्लर प्रशिक्षण केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमती
वैशालिताई विलासराव देशमुख यांची भेट.

प्रशिक्षणार्थी महिला भगिनीशी साधला संवाद.

लातुर प्रतिनिधी:-
विलासराव देशमुख फाऊंडेशन च्या वतीने बाभळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या
मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन
श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट दिली तसेच प्रशिक्षणार्थी
महिला भगिणीसोबत संवाद साधला.
विलासराव देशमुख फाउंडेशनने महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने आणखी
एक पाऊल पुढे टाकले आहे.ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचलिका सौ.अदिती अमित
देशमुख यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महीलांना स्वयंरोजगार आणि
स्वावलंबनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या अंतर्गत बाभळगाव येथे विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने महिलांना
स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राची सुरूवात
करण्यात आली असून या केंद्रास विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमती
वैशालिताई विलासराव देशमुख यांनी दि.२२ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी सदिच्छा
भेट दिली आणि या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला भगिनीशी
संवाद साधला व महिलांनी या प्रशिक्षणातून स्वतःच्या पायावर उभे रहावे व
आपली आर्थिक प्रगती करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी असतात,या
पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख फाउंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन
स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.या प्रशिक्षण
केंद्रामध्ये महिलांना पार्लर विषयीची प्राथमिक माहिती देऊन प्रशिक्षण
दिले जात आहे. यामध्ये वॅक्सिंग,विविध हेअर कट,
मॅनिक्युअर,पेडिक्युअर,थ्रेडिंग,मेकअप,फेशियल याविषयी प्रशिक्षण दिले जात
आहे.महिला भगिनींनी या प्रशिक्षणाबद्दल विलासराव देशमुख फाऊंडेशनचे आभार
मानले.यावेळी फाऊंडेशन च्या समन्वक संगीता मोळवणे गावचे उपसरपंच गोविंद देशमुख,
मा उपसरपंच अविनाश देशमुख,गावातील प्रमुख व्यक्ती, ट्रेनर शबाना
शेख,गजानन बोयने,प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *