अशोक गुरनाळे यांना लायन्स क्लब अध्यक्षपदाचा पदभार
उदगीर: भालकी तालुक्यातील मेथी-मेळकुंदा येथील सुपुत्र लायन अशोक गुरनाळे यांना लायन्स क्लब छत्रपती
संभाजीनगर अध्यक्षपदाचा पदभार मिळाला. ३५वा पदग्रहण सोहळा एम्बेसडर अजंता हॉटेल येथे दिमाखात
नुकताच पार पडला. या सोहळ्यात इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन राहुल औसेकर यांनी नवीन कार्यकारिणीला
शपथ दिली, तर रिजन चेअरपर्सन लायन राधा तोरनेकर यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. यावेळी आठ
नवीन सदस्य क्लबमध्ये सामील झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजवंदना लायन प्रतिभा गुरनाळे यांनी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप
प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. मावळते अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर काळे यांनी
स्वागतपर भाषणातून कार्यकाळातील अनुभव सांगितले. मागील वर्षभरातील कार्याचा आढावा माजी सचिव
लायन रणजीत चव्हाण यांनी सादर केला, तर येत्या वर्षातील आय प्रोजेक्ट संदर्भातील सविस्तर माहिती
प्रोजेक्ट हेड लायन योगेश धोत्रे यांनी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष लायन अशोक गुरनाळे यांनी सांगितले की, यावर्षीपासून आरोग्य सेवा, शिक्षण,
पर्यावरण आणि सामाजिक सक्षमीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. कार्यक्रमास मल्टीपल कौन्सिल
चेअरपर्सन लायन सुनील देसरडा, लायन विवेक अभ्यंकर, झोन चेअरपर्सन लायन अश्विनी जैस्वाल, जयराज
पाटील, डॉ. पंडित पळसकर, डॉ. शहाजी शेषेराव बिरादार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व
मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निजोजन लायन दिनेश पाटील, जितेंद्र महाजन, दयाल डीडोरे, अशोक भालेकर, प्रदीप देशपांडे,
अशोक जगधने, संतोष काथार यांनी केले होते. तर आभार लायन दत्तात्रय देशपांडे यांनी मानले.
