निलंगा शहरातील दादापीर दर्गा परिसरात रस्ते नाल्या करा परिसरातील नागरिकांचे प्रशासनाला साकडे
निलंगा ;- येथील दादापीर दर्गा ,हैदररिया नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशी नागरिकांना मोठ्या समस्याना तोंड द्यावं लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून येथे रस्ते नाल्या नसल्याने अनेक वेळा मागणी करुन ही प्रशासन लक्ष देत नाही सध्या पावसाळा असल्याने येथे रस्ते नाल्या नसल्याने पायी पण चालणे अवघड होऊन बसले आहे याचा जास्त त्रास शाळकरी मुलांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अंतर्गत जिल्हा लातूर युवती कार्यकारी अध्यक्षा विशाखा रोहित हातागळे , निलंगा तालुका महिला अध्यक्षा राधाताई सांगावे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देऊन रस्ते व नाल्या तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे . निवेदनात म्हटलं आहे की,दादापीर नगर येथील रस्ते , नाल्या, सांडपाणी, पावसाचे पाणी याचा या परिसरातील रहिवाशीना त्रास आहे सर्व नागरिकास चिखलातून घाणीतून ये जा करावे लागत आहे..आणि या मुळे अनेकाना मोठ मोठ्या रोगास बळी पडावे लागत आहे नागरिक पाय घसरून पडत आहेत.लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे . गॅस सिलेंडर सुद्धा महिलांना डोक्यावर घेऊन जावं लागतं आहेत.या कडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. तात्पुरते मुरुम टाकून रस्ते त्वरीत व्यवस्थित करावे अशी मागणी करण्यात आली आहे . मागण्या मान्य नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनाची प्रति उपविभागीय अधिकारी निलंगा, तहसीलदार निलंगा व मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा यांना देण्यात आले आहे. यावेळी सोनाली तळेकर,पद्मिनी सोनटक्के,छाया विहिरे ,आरती साळुंके, लक्ष्मी शिंदे, अंजना कांबळे, करूना कांबळे,पूनम सूर्यवंशी, जोरा बिबराले,गीताबाई गायकवाड,अनिता लोंढे,नंदिनी नेटके,रेखा सरपाळे,नसीम शेख नसीम शेख, खुर्शीदबी सय्यद , अमीना पठाण ,मशिदबी खादीम, अमिरा शेख ,शमीम काजी , आशिया कुरेशी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या होते.
