• Fri. Aug 22nd, 2025

शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन 

Byjantaadmin

Aug 22, 2025

शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन 

लातूर:- या सरकारने  शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.सोयाबीनचा भाव साडेतीन हजाराच्या पुढे जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणणारे मुख्यमंत्री सध्या गप्प बसले यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. बळीराजा होरपळा जात आहे मराठा आरक्षणाची दग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली असून सुद्धा या सरकारला हे दिसत कसं नाही या सरकारला जाग करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम, राजकुमार माने यांच्या नेतृत्वामध्ये हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व सरकार समोर या मागण्या प्रमुख मागण्या करण्यात आले शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्या, मराठा व इतर समाज बांधवांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, दुधाला प्रति लिटर 70 रुपये प्रमाणे भाव द्या, ऊसाला एफ आर पी प्रमाणे सात दिवसात रक्कम द्या.साखर कारखान्यावर दोष विरहित पारदर्शक दोषविरहित वजनकाटे  बंधनकारक करा,अतिवृष्टी झाल्याने दुष्काळ जाहीर करा,हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्या, व ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर देशाच्या निवडणुका घ्या या प्रमुख मागण्यासमोर करत आजही एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करून लातूर जिल्हाधिकारी  कार्यालयात या मागणीचे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे सकारात्मक बघून तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या असे नमूद करण्यात आले.यावेळी   संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव इर्शाद शेख, महानगराध्यक्ष गजानन जाधव, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष मिथुन दिवे, बळवंत चिंचोलकर,उत्तम फड, रमेश लाबोटे, जावेद मुजावर,सलीम पठाण सिद्धेश्वर तेलंगे, जिल्हा संघटक मेहबूब सय्यद, मोहनेश्वर विश्वकर्मा,राजकुमार भालेराव या पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षरी निवेदन देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *