सलग दुस-या दिवशी सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत मनपाची कारवाई
५५० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त
लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांच्या उपस्थितीमध्ये आज सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत शहरातील गंजगोलाई भागातील दोन गोडावुन मध्ये धडक कारवाई करून एकूण ५५० किलो (अंदाजे ८० हजार रूपये किंमतीचा प्लास्टिक साठा) जप्त करण्यात आला.सदरील कारवाई मध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे, धोंडिबा सोनवणे, अक्रम शेख यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.ही मोहीम अशीच सुरू राहणार असून आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबग वापर टाळून कापडी बॅगचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा असे आवाहन उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे.
