पूर्णवादी परिवाराने गौरव केलेल्या सर्वच महिला उपक्रमशील
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर : जगात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. आपल्या आयुष्यात कोणत्याही कामाच्या माध्यमातून मदत केली तर त्या मदतीचा समाजाकडून गौरव होत असतो. पुर्णवादी परिवाराने गौरव केलेल्या सर्वच महिलांनी आपापल्या क्षेत्रात चांगली कामे केली आहेत. त्याचा समाजाला भविष्यात निश्चित फायदा होईल, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
पुर्णवादी नारी फोरमच्या वतीने सति सौभाग्यवती मनकर्णिका माता यांच्या मंदीराच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 20 ऑगस्ट रोजी औसा रोडवरील गायत्री उत्सव हॉलमध्ये आयोजित ‘गौरव कर्तृत्वाचा’ या कार्यकमात विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी पूर्णवादी नारी फोरमच्या प्रमुख विभावरीताई कुलकर्णी, लातूर मनपा आयुक्त श्रीमत्ती मानसी मीना, लातूर पूर्णवादी नारी फोरमच्या अध्यक्षा अमिता अशोक गोविंदपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुर्णवादी परिवाराच्या वतीने समाजातील वंचितांसाठी काम करणार्या महिलांचा सन्मान आयोजीत करण्यात आला होता. प्रारंभी प. पू. पारनेरकर महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शशीकांत देशमुख व वैशालीताई देशमुख यांनी अभंग गाऊन भक्तीमय वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक अशोक गोविंदपूरकर यांनी करून पुर्णवादी नारी मंचच्या वतीने आयोजीत सन्मानाबाबतची भूमिका विषद केली. प. पू. पारनेरकर महाराज यांनी सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मान करण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेवरूनच हा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आल्याचे गोविंदपूरकर यांनी सांगितले. यावेळी सौ. स्मिताताई परचुरे, संध्याताई बारगजे व महापालिका आयुक्त मानसी मीना यांचा सन्मान पुर्णवादी परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त मानसी मीना, स्मिताताई परचुरे व संध्याताई बारगजे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुर्णवादी परिवाराला प. पू. पारनेरकर महाराज यांच्या भगिनी विभावरी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, स्त्री ही देवीचे रूप असून कन्यापासून ते मातेपर्यंतचा प्रवास हा स्त्रीचे खरे रूप आहे. आज समाजात महिला शक्तीच्या माध्यमातून सामाजीक उपक्रमं करणार्या महिलांचा सन्मान हा पुर्णवादी परिवारासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. पुर्णवादी परिवार हा सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला असून आजच्या काळात खर्या अर्थाने महिलांना सन्मानासोबत योग्य वागणुकीचीही गरज आहे. पुर्णवादी नारी फोरमच्या वतीने आयोजीत केलेला हा उपक्रम निश्चीतच आदर्शवत आहे. यावेळी त्यांनी पुर्णवादी परिवाराच्या वतीन सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पुर्णवादी नारी फोरमच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर मनपाच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती तस्नीम पटेल, ज्येष्ट समाज सेविका श्रीमती संध्याताई बारगजे, ज्येष्ट समाजिक कार्यकर्त्या स्मिताताई परचुरे, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सुनिताताई अरळीकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्रीमती स्मिताताई परचुरे, श्रीमती संध्याताई बारगजे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक गोविंदपूरकर यांनी केले. सुत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले. टेकाळे यांनी आभार मानले. पूर्णानंदच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुमुख गोविंदपूरकर, संजय कुलकर्णी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
