• Wed. Aug 20th, 2025

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करून धीर द्या : काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे मागणी

Byjantaadmin

Aug 20, 2025

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करून धीर द्या : काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची राज्य सरकारकडे मागणी

लातूर – गेल्या पाच दिवसात झालेल्या अती मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना भरीव आर्थिक मदत करावी व त्यांना या अडचणीच्या काळात धीर द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांची राज्य सरकारकडे केली

काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री श्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पत्र देऊन राज्यातील आणि लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीकडे लक्ष वेधलेमागील पाच ते सहा दिवसात झालेल्या पावसामुळे राज्यात १४ लाख एकरावरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातही पिकांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. येथे तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांना फटका बसण्याबरोबरच अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील अनेक जनावरे वाहून गेली आहेत. आत्तापर्यंत ४९८ जनावरे दगावल्याची माहिती आहेअतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील १३ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे ५८८ जणांचा संसार उघड्यावर आला आहे. मराठवाड्यासह राज्यात झालेल्या या नुकसानीची गंभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना, ग्रामस्थांना आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *