• Wed. Oct 15th, 2025

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूर शहर, जिल्हा काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

Byjantaadmin

Aug 20, 2025

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूर शहर, जिल्हा काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

  लातूर; अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी प्रकरणी सुरु केलेले आंदोलन देशातच नव्हे तर जगभरात गाजत आहे. राहूल गांधी यांच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. २१ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्हाभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी भारतीय निवडणुक आयोगावर गंभीर आरोप करीत निवडणुक आयोगाने भाजपाशी हातमिळवणी करुन देशभारात मतदान चोरी केल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोटाळा आहे  एक कोटी नवीन मतदार जादुने तयार झाल्याचा दावा, बेगळुरुतील महादेवपुरा मतदारसंघात एकाच व्यक्तीची अनेकवेळा नोंदणी, एकाच प्रत्त्यावर असामान्य मतदार संख्या, एकाच व्यक्तीने अनेक वेळा मतदान केल्याचे आरोप, बिहारमधील एसआयआर आणि मतचोरीचा मुद्यावरुन राहूल गांधी यांनी बिहारमधून ‘मतदार हक्क यात्रा’ काढली. निवडणुक प्रक्रियेतील अनियमिततेवर प्रकाश टाकुन राहुल गांधी संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत, असे अभय साळुंके म्हणाले.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे, असे नमुद करुन अभय साळुंके पुढे म्हणाले, पक्षाच्या ग्राम समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून संपुर्ण जिल्हाभर घराघरापर्यंत जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. घरोघरी जाऊन राहूल गांधी यांच्या लढ्याची, मतदान चोरीची माहिती जनसामान्यांपर्यंत जाणार आहे. अॅड. किरण जाधव म्हणाले, लातूर शहरातील १८ प्रभागांत स्वाक्षरी मोहीम राबवली पोहोचवलीजाणार आहे.

त्यासाठी बुथ प्रमुख, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘वोट चोरी के खिलाफ… राहुल गांधी के साथ’, या आशयाचे पत्रक तयार करण्यात आहे. स्वाक्षऱ्यांचे संकलन करुन खासदार राहूल गांधी यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.काँग्रेस भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान सय्यद, अनुसूचित जाती काँग्रेस विभागाचे शहराध्यक्ष प्रा प्रविण कांबळे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक युनूस मोमीन, प्रविण सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे-पाटील, आकाश भगत, सुलेखा कारेपुरकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *