• Tue. Aug 19th, 2025

अरे कहना क्या चाहते हो… डायलॉग फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

Byjantaadmin

Aug 19, 2025

मुंबई – बॉलिवूडमधील चरित्र अभिनेते अच्युत पोतदार आज काळाच्या पडद्याआड गेले. भारत एक खोज आणि आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात प्राध्यपकाची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता अच्युत पोतदार यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी ते ग्रस्त होते. काल रात्री त्यांची तब्यत बिघडली आणि ते बेशुद्ध झाले, त्यानंतर त्यांना ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज (19 ऑगस्ट, मंगळवार) दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.मराठी कुटुंबातील अच्युत पोतदार यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी माध्यमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. अनेक मराठी अभिनेते, अभिनेत्री, राजकीय व्यक्ती त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाची घटना अत्यंत दुःखद आहे. मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रातील एक हृदयस्पर्शी कलाकार ही त्यांची ओळख. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो! तसेच त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करत दिवंगत अभिनेता अच्युत पोतदार यांना श्रद्धांजली वाहिली.

मराठी कलाकारांकडून संवेदना व्यक्त

सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकारांनी अच्युत पोतदार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अच्युत पोतदार यांच्या निधनाने हिंदीसह मराठी सिने इंडस्ट्रीमधून संवेदना व्यक्त होत आहेत.

अभिनय आणि चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी अच्यूत पोतदार हे इंडियन ऑइल कंपनीत नोकरीला होते. 25 वर्ष त्यांनी नोकरी केली. अभिनय क्षेत्रातील करिअरला त्यांनी फार उशिरा सुरुवात केली. मात्र त्यानंतरही त्यांनी सत्यदेव दुबे, विजया मेहता आणि सुलभा देशपांडे सारख्या रंगमंचावरील दिग्गजांसोबत बराच काळ स्टेज शेअर केला.

कुठे आणि केव्हा होणार अंत्यसंस्कार

अच्युत पोतदार यांचा जन्म २२ ऑगस्टला झाला होता. तीन दिवसांनी त्यांचा वाढदिवस होता, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळातील समस्यांनी ते ग्रस्त होते. त्यामुळेच त्यांना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (19 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

थ्री इडियट्सच नाही, या चित्रपटांमधील भूमिकाही गाजल्या

अच्यूत पोतदार यांनी 25 वर्षे इंडियन ऑइलमध्ये नोकरी केली. 80च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकामध्येही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. थ्री इडियट्स, फरारी की सवारी, दबंग -2, आर राजकुमार, भूतनाथ, लगे रहो मुन्ना भाई, परिणीता, हम साथ-साथ है, दाग द फायर, आक्रोश या सारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. याशिवाय छोट्या पडद्यावर भारत एक खोज, शुभ मंगल सावधान आणि ऑल द बेस्ट सारख्या मालिकांमधूनही त्यांनी स्वतःच्या अभिनयाचा वेगळा ठसा निर्माण केला.

‘या’ डायलॉगने प्रसिद्ध 

थ्री इडियट्स चित्रपटात अच्युत पोतदार प्राध्यापकाच्या भूमिकेत होते. या चिपत्रटातील, ‘अरे बोलना क्या चाहते हो’ डायलॉग सोशल मीडियावर मीम्सच्या रुपाने खूप प्रसिद्ध झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *