नांदेडच्या लेंढी प्रकल्पाच्या पाणलोटात रात्री अडीचपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सात गावांना पाण्याचा वेढा पडला आहे .नांदेडमध्ये पावसाने 8 बळी घेतले आहेत. मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव भेंडेगाव या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला असून घरे पाण्याखाली गेली आहेत .पूरग्रस्तांची दैना पाहण्यासाठी 24 तासांनी मुखेडमध्ये भाजपचे आमदार तुषार राठोड आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत .
नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला असून आतापर्यंत एकूण आठ जणांचा बळी गेलाय .300हून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे . पावसामुळे या भागात मोठे नुकसान होत असताना मुखेड मतदार संघाचे आमदार 24 तास उलटून गेल्यानंतर गावात पाहणीसाठी आले . त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे .
आमदार 24 तासांनी मुखेडमध्ये उगवले
हसनाळ गावात मुखेड ते भाजपचे आमदार तुषार राठोड पाहणीसाठी 24 तास उलटून गेल्यानंतर उगवले .त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे .संतप्त नागरिक स्थानिक आमदारांविरोधात एकवटले आहेत . आमदारांना प्रश्न विचारले जात आहेत ,जाब विचारला जातोय . पुराने नुकसान होत असताना 24 तास आमदार होते कुठं असावा उपस्थित केला जातोय . नांदेड मध्ये कोसळणाऱ्या पावसाने अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय .100 हून अधिक जण पुराच्या पाण्यात अडकले होते .बोटीने त्यांची सुटका करावी लागली .सैन्य दलाला सुद्धा प पाचारण करण्यात आलं होतं . इतकी आणीबाणी ओढवलेली असताना आमदार कुठे होते ?असा सवाल ग्रामस्थ करतायत .
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एका रात्रीत झालेल्या पावसाने अनेकांचे संसार उध्वस्त केलेत. हसनाळ गावातील प्रदीप पाटील-हसनाळकर हे आपल्या उपजीविकेसाठी छोटासा किराणा दुकान चालवत होते. ह्या किराणा दुकानातील साहित्य पूर्णपणे खराब झालं आहे. तांदूळ, दाळसह सर्व किराणा माल पाण्यात भिजून गेलाय. इतकचं काय तर घरात ठेवलेली महत्वाची कागदपत्रे पाण्यात पूर्णपणे भिजून गेलेत.
नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती; लेंढी प्रकल्प क्षेत्राची चौकशी होणार
नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. प्रशासनाने तात्काळ यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केली आहे आणि अनेकांचे जीव प्रशासनाने वाचवले. दुर्दैवाने नांदेड जिल्ह्यातील पाच लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. तेलंगणामधील काही लोक देखील वाहून गेली आहेत. दक्षिणेतील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू असल्याने पाणी पातळी कमी होण्यास मदत होते. लेंढी धरण क्षेत्रात 30 टक्के पाणीसाठा करण्याचा विचार होता. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कसा आला या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटला चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
