मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे यांचा योग्य ते बंदोबस्त करा अन्यथा हीच जनावरे नगरपालिकेत सोडू — मुजीब सौदागर
निलंगा प्रतिनिधी: निलंगा शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे तसेच मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.शिवाय गेल्या काही दिवसातच मोकाट कुत्र्यांनी जवळपास 18 जणांचा चावा घेतला आहे ज्यात जास्त प्रमाणात लहान मुले व विद्यार्थी यांचा समावेश आहे. तसेच शहरात मोकाट जनावरे ही मोठ्या प्रमाणात फिरत असून हीच जनावरे नागरिकांच्या अंगावर येतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास मोठा धोका होऊ शकतो हीच जनावरे रस्त्याच्या मध्यभागी समूहाने उभी राहून तर कधी रस्त्याच्या मध्यभागी समूहाने बसलेल्या असतात त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो,तर कधी एकमेकात ही भांडतात त्यात वाहनाचे अनेक वेळा नुकसान झाले आहे आता पुढे पोळा, गणेशोत्सव,गौरीपूजन अनेक सन आहेत ज्यामुळे शेतकरी,महिला भगिनी, नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येतात त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व तत्काळ निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी तसे नाही झाल्यास येणाऱ्या 25 तारखेला सोमवारी सदरील मोकाट जनावरे नागपालिकेत सोडून निषेध करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांनी मंगळवारी निवदणाद्वारे मुख्याधिकारी यांच्या कडे दिला आहे
