अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने आ .संभाजी पाटील निलंगेकर यांना निवेदन
निलंगा- अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदु खाटीक युवा संघटन च्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे हिंदु खाटीक, निलंगा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२५ साठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी महात्मा जोतिबा फुले यांचे शिष्य, सहकारी, सत्यशोधक समाजाचे अग्रदूत डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याच्या प्रमुख मागणी सह समाजाच्या विकासासाठी विविध मागण्या सोडवणुकीसाठी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे , डॉ प्रमोद हातांगळे, श्री डोंगरे गुरुजी, श्री प्रल्हाद जी बाहेती, श्री सतिश जी बेंद्रे, अखिल भारतीय संतुजी संतुजी ब्रिगेड निलंगा तालुकाध्यक्ष श्री राहुल हातांगळे, श्री माधव जी टोपे, श्री सुशांत जी साबणे,श्री निळकंठ जी गंगणे आदी उपस्थित होते
