स्नेहलता ब्युटी पार्लरचे शानदार उद्घाटन संपन्न
लातूर : अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज “स्नेहलता मेकओव्हर ब्युटी पार्लर” चे उद्घाटन लातूर येथील फेमस ब्युटी मेकअप आर्टिस्ट सौ.रुपाली सोलंकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. विशेष म्हणजे, लातूर शहरातील प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट सौ.रुपाली सोलंकर यांनी ग्रामीण परिसरातील विद्यार्थिनींना संधीची सुरुवात केल्यामुळे त्यांचे महिला वर्गातून कौतुक केले जात आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लातूर शहरातील प्रसिद् मेकअप आर्टिस्ट रुपाली सोलंकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रक्षा रेड्डी, निकिता शेवाळे, रितिषा रेड्डी होत्या.सदरील मान्यवरांच्या हस्ते या अद्यावत ब्युटी पार्लरचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर मेकअप आर्टिस्ट रुपाली सोलंकर यांनी महिलांच्या सौंदर्याबाबत जागरुकता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आणि कोकळगाव सारख्या ग्रामीण भागात अशा दर्जेदार सेवांची उपलब्धता होणे हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच मेकअप आर्टिस्ट रुपाली सोलंकर यांनी पार्लरमधील सेवांची माहिती दिली त्यामध्ये या पार्लरमध्ये फेशियल, हेअरस्टाईलिंग, मेकअप, स्किन ट्रीटमेंट, आणि नेल आर्ट यांसारख्या प्रगत सेवा उपलब्ध असून, आधुनिक उपकरणे आदींच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. “स्नेहलता ब्युटी पार्लर” ग्रामीण भागातील सौंदर्य सेवांसाठी एक नवा मापदंड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात कोकळगाव येथील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आणि या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी रियांस सोलंकर,संतोष वांजरवाडे, गोविंद आदटराव, प्रणव कोळी,श्रीदेवी वांजरवाडे, निलावती वागन्ना, आरती लामतुरे, शिवगंगा लामतुरे, विद्याताई पाटील, दुर्गाताई बेद्रे, प्रणिता कोळी, मीनाक्षी कोळी,चंद्रकला कोळी, अयोध्या कोळी,शिवलीला मुरमे, रंजना आदटराव, स्वप्नाली आदटराव,मनिषा सगर, महानंदा पाटील, वैष्णवी बेद्रे,शिवानी बिराजदार, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
