निलंगा शिवसेनेच्या वतीने नूतन युवा सेना, संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ, पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांचा सत्कार
निलंगा :-निलंगा विधानसभा कार्यक्षेत्रातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नवनियुक्त युवासेना पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड संभाजी सेना मराठा सेवा संघ यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंखे यांचा शासकीय विश्रामगृह निलंगा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आज निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक बोलावून या बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रमोद कदम संभाजी सेनेचे प्रवक्ते म्हणून निवड झालेले राजकुमार साळुंखे व मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले विनोद सोनवणे यांच्यासह निलंगा तालुक्यातील युवा सेनेचे जिल्हा समन्वयक उमेश सातपुते उपजिल्हाप्रमुख प्रशांत वांजरवाडे तालुकाप्रमुख सचिन पवार शहर प्रमुख ओमकार सगरे तालुका समन्वयक अजय मसलगे उपतालुकाप्रमुख अमोल कोरे, प्रसाद पेद्दे, देवणी तालुकाप्रमुख कृष्णा वजनम आदी युवा सेना पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे महिला आघाडी शहर प्रमुख दैवताताई सगर शिवसेना तालुका समन्वयक शिवाजीराव पांढरे अरुणाताई माने सविताताई पांढरे पार्वती ताई कांबळे नागिनताई कांबळे पद्मिनी ताई पिंगळे आधी प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना व काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या विचाराने बांधील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुका जिंकावयाच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एका विचाराने एका मनाने कामाला लागले पाहिजे सन्माननीय प्रबोधनकार ठाकरे सन्माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक असणारे कार्यकर्ते नैतिकता व विचार जोपासत असतात यामुळे अशा विचार जोपासणाऱ्या लोकांच्या हातीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता असली पाहिजे यासाठी पण सर्वजण मिळून एक दिलाने लढू या असे मत यावेळी त्यांनी मांडले.