उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…
निलंगा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अत्याधुनिक दुर्बिणीव्दारेलॉप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.यात अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, पित्ताशयातील खडे, शरीरावरील गाठी आणि स्तनातील गाठी या आजारावर दि.१८ ऑगस्ट रोजी तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी लातूर येथील डॉ.निखिल काळे जनरल सर्जन व लॉप्रोस्कोपी तज्ञ,यांच्या निगराणीखाली डॉ.निळकंठ सगर जनरल सर्जन डॉ. दिनकर पाटील भूल तज्ञ,डॉ.शेषराव शिंदे डॉ.दत्ता पिनाटे, हे शस्त्रक्रिया करणार आहेत. या शिबीरामध्ये अत्याधुनिक दुर्बिणीव्दारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी वेदना होतात. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अर्चना पाटील किर्दक ,उपसंचालक लातूर ,डॉ.प्रदीप ढेले जिल्हा शल्य चिकित्सक लातूर ,डॉ.कुलकर्णी व्हि.डी.कुलकर्णी वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या वतीने करण्यात आले आहे.यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे ही खालील प्रमाणे असून यात आयुष्यमान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड व महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत येणारी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी व शिबीरात सहभागी होण्यासाठी सागर सांगवे मो. नं. 8275095362, रमण पंडे मो.नं. 9579368073 यांच्याशी संपर्क साधावा.
