पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलचे लोकार्पण,
निलंगा येथील मैत्री फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलचे लोकार्पण, वृक्षारोपण तसेच निलंगा नगरपालिकेतील सफाई महिला कर्मचारी भगिनींचा सन्मान सोहळा अशोकनगर येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शरदजी झडके, उपविभागीय पोलिस अधिकारी विशालजी ढुमे पाटील, तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, निलंगा न.प. मुख्याधिकारी सुंदरजी बोदेर, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉ. विशेषजी कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सुधीरजी सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी सुरेशजी गायकवाड, शिक्षण विस्ताराधिकारी संतोषजी स्वामी, मैत्री फाऊंडेशनचे बलवानजी सूर्यवंशी, अमोलजी कांबळे, गिरीशजी पात्रे, अमोलजी सूर्यवंशी, विष्णूजी कांबळे, पवनजी सूरवसे आदींसह नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.