• Thu. Oct 16th, 2025

हरित लातूर, सुंदर लातूर”या संकल्पनेतून वन परिमंडळ निलंगा यांचेकडून भव्य वृक्ष लागवड मोहीम

Byjantaadmin

Aug 17, 2025

स्वातंत्र्य दिनाच्या औचीत्याने  “हरित लातूर, सुंदर लातूर”या संकल्पनेतून वन परिमंडळ निलंगा यांचेकडून भव्य वृक्ष लागवड मोहीम

निलंगा:-“हरित लातूर, सुंदर लातूर”मोहिमेनिमित्त वनपरिक्षेत्र विशेष कार्य निलंगा. मधील वन परिमंडळ निलंगा अंतर्गत विविध ठिकाणी वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या निमित्ताने एकाच दिवशी 15 ऑगस्ट 2025 रोजी मौजे लांबोटा/केळगाव वन उद्यान येथे मा. ना. श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर माजी मंत्री तथा आमदार निलंगा यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करून. भव्य वृक्ष लागवडीची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमासाठी मा. श्री. शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा ,मा. श्री. प्रसाद कुलकर्णी तहसिलदार निलंगा, मा. श्री. विशाल ढुमे उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा, मा. श्री. सुधीर सूर्यवंशी पोलीस निरीक्षक निलंगा, मा .श्री. शुभम पवार वनपरिक्षेत्र अधिकारी वि.का. निलंगा, मा. श्री. विवेक नारंगवाडे वन परिमंडळ अधिकारी निलंगा, मा. श्री. शिवाजी कदम अप्पर तहसिलदार कासार शिरशी, मा. श्री. सुभाष कानडे नायब तहसिलदार निलंगा, मा. श्री. परविन आळंदकर, मा. श्री. कुलदीप देशमुख, मा. श्री. अनिल धुमाळ, मा. श्री. अमोल पाटील, श्री. ज्ञानेश्वर मंगरुळे वनरक्षक निलंगा, श्री. सोपान बडगणे वनरक्षक औराद,  शहाजनी , श्री. गोकुळ राठोड वनरक्षक श्री. राजकुमार देशमुख मंडळ अधिकारी निलंगा, श्री. सरतापे ग्राम महसूल अधिकारी लांबोटा श्री. डॉ. विठ्ठल सांडूर सर, श्री. एस .एस. बदनाळे सर. व विद्यार्थी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, श्री. संजय कदम सर मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा लांबोटा, श्री. सत्यवान जढाळे सर, श्री. किशोर दूढे सर, श्री. सतिष गजभार सर, श्री. शिवाजी भदरगे सर, श्री. लिंबराज सूर्यवंशी सर व विद्यार्थी, श्री दिनकर पासमे सर मुख्याध्यापक. शिवाजी माध्यमिक आश्रम शाळा केळगाव. श्री चंद्रकांत रोड्डे व पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने “हरित लातूर, सुंदर लातूर” मोहिमे निमित्त वृक्ष लागवड करण्यासाठी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *